हँडब्रेक न लावता ट्रक उभा करणे बेतले जिवावर

हँडब्रेक न लावता ट्रक उभा करणे बेतले जिवावर
Published on

ट्रकचालकाची निष्काळजी बेतली तरुणाच्या जीवावर

पनवेल, ता. २२ (वार्ताहर) : एका ट्रकचालकाच्या निष्काळजीमुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन ट्रकमध्ये चिरडून एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १९) जेएनपीए सेवा रस्त्यावरील पाडेघर परिसरात घडली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
या दुर्घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव अंशू यादव असे असून तो मूळचा मध्य प्रदेशमधील आहे. यातील तक्रारदार रजनीश यादव हा ट्रक घेऊन जेएनपीए सेवा रस्त्याने जात होता. या वेळी त्याच्यासोबत त्याचा पुतण्या अंशू यादव हादेखील होता. रात्रीच्या वेळी रजनीश यादव याने आपला ट्रक के. के. लॉजिस्टिक कंपनीच्या बाजूला असलेल्या पाडेघर येथे उभा केला. त्यानंतर अंशू ट्रकची पाहणी करण्यासाठी खाली उतरला होता. याच वेळी रजनीश यादव याच्या ट्रकच्या मागे जगदीप गुप्ता या चालकाने आपला ट्रक उभा केला; मात्र त्याने खाली उतरताना हँडब्रेक लावला नसल्याने ट्रक अचानक वेगाने पुढे सरकला. या वेळी दोन्ही ट्रकच्या मध्ये उभा असलेला अंशू चिरडला गेला. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी ट्रकचालक जगदीप गुप्ता याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com