

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : शहरातील वाहतूक पोलिसांची कमतरता, त्या तुलनेत रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांवर ताण येत आहे. त्यात वाहतूक पोलिसांच्या मदतीला नेमलेले ट्रॅफिक वॉर्डनचे वेतन तीन महिन्यांपासून मिळाले नसल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात शाळा सुरू झाल्याने मुलांचा शैक्षणिक खर्च व शालेय फी भरायची कशी, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
ठाणे शहरातील वाहतूक शाखेकडे आवश्यकतेपेक्षा कमी मनुष्यबळ उपलब्ध असल्याने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या माध्यमातून वाहतूक शाखेसाठी १५० ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली आहे. दरमहा १० हजार रुपये मानधनावर कार्यरत असलेले हे वॉर्डन तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन, माजिवडा नाका, कापुरबावडी नाका; तसेच अन्य प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियंत्रणाचे काम करतात.
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या वॉर्डनना तीन महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळित झाले आहे. त्यातच शाळा सुरू झाल्याने मुलांची फी, पुस्तके आणि इतर शैक्षणिक खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. वेतन रखडल्यामुळे संतप्त झालेल्या ट्रॅफिक वॉर्डननी ठाणे महापालिकेचे सभागृह नेते हणमंत जगदाळे यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी जगदाळे यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
सकारात्मक प्रतिसाद
या संदर्भात सभागृह नेते हणमंत जगदाळे यांना विचारले असता, उद्याच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून, ट्रॅफिक वार्डन यांच्या थकीत मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे लवकरच रखडलेले मानधन मिळेल, अशी अशा ट्रॅफिक वार्डन यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.