योगातून निरोगी जीवनाचा संदेश

योगातून निरोगी जीवनाचा संदेश
Published on

योगातून निरोगी जीवनाचा संदेश
द. ग. तटकरे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन
माणगाव, ता. २२ : माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या द. ग. तटकरे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र आचार्य यांनी योग दिनाचे महत्त्व, त्यामागील उद्देश तसेच नियमित योगाभ्यासाचे आरोग्यदायी फायदे स्पष्ट केले. प्राचार्य डॉ. जयशंकर पांडेय यांनी योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मानसिक स्वास्थ्यही जपले जाते, असे सांगत दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
योग प्रशिक्षक मनोज उभारे यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करून त्यांचे आरोग्यदायी लाभ समजावून सांगितले. कार्यक्रमास क्रीडा विभागप्रमुख प्रा. डॉ. बी. के. सिनगारे, प्रा. नेहा तुराई, प्रा. आदिल बडे, प्रा. शुभम येरुणकर, प्रा. स्वप्निल सकपाळ यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com