पहिल्याच पावसात काँक्रीट रस्त्यावर पाणी साचले; कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

पहिल्याच पावसात काँक्रीट रस्त्यावर पाणी साचले; कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
Published on

पहिल्याच पावसात काँक्रीट रस्त्यावर पाणी साचले; कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
मालाड, ता. २२ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मालवणी गेट क्रमांक ३ परिसरातील साने गुरुजी वसाहतीत नुकत्याच बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर पावसाच्या पहिल्याच सरीत पाणी साचल्याने रहिवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सोमवारी (ता. २२) झालेल्‍या पावसानंतर स्‍थानिकांना त्रास सहन करावा लागला.
३१ मे रोजी पूर्ण झालेल्या या रस्त्याच्या कामावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्ता असमतोल राहिल्याने पावसाचे पाणी थेट घरांसमोर साचत आहे. परिणामी नागरिकांना घाण पाण्यातून ये-जा करावी लागत असून, वाहनांच्या हालचालीमुळे चिखल व घाण पाण्याचे शिंतोडे अंगावर उडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पहिल्याच पावसात ही परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी मुसळधार पावसात नुरी चाळ तसेच साने गुरुजी वसाहत, ब्लॉक क्रमांक ३ मधील घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनेमुळे पालिकेच्या रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्त्याची पातळी योग्य न ठेवता काम कसे पूर्ण करण्यात आले, तसेच कामादरम्यान संबंधित कंत्राटदार आणि देखरेख करणारे पालिका अभियंते नेमके काय करत होते, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून जबाबदार कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याची समस्या तातडीने दूर करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com