मुंबईत पावसाच्या शिडकावाने विजेची मागणी घसरली

मुंबईत पावसाच्या शिडकावाने विजेची मागणी घसरली
Published on

पावसाच्या शिडकाव्याने विजेची मागणी घसरली

मुंबई, ता. २२ ः मॉन्सूनला विलंब झाल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईची विक्रमी टप्प्यावर पोहोचलेली विजेची मागणी आज झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने घसरणीला लागली आहे. ४,६०० मेगावाॅटच्या घरात नोंदल्या जाणाऱ्या विजेच्या मागणीत आज २५०-३०० मेगावाॅटची घट होऊन ४,३०० मेगावाॅट एवढी नोंदली आहे. त्यामुळे वीज वितरण जाळ्यावरील भार काहीसा कमी झाला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट, अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पाॅवरकडून सुमारे ४७ लाख वीज ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. आतापर्यंत एप्रिल-मे महिन्यात मुंबईत विजेची मागणी ३,५००-४,००० मेगावाॅट एवढी नोंदली जाते; मात्र मे महिन्यात वाढत जाणारा विजेच्या मागणीचा आलेख कायम राहिल्याने ११ मे रोजी ४,५१० मेगावाॅट एवढी आतापर्यंतची सर्वाधिक मागणी नोंदली होती. त्यानंतर ९ जूनला ४,६१० मेगावाॅट एवढी विजेची मागणी नोंदली होती; मात्र आज सकाळी वरळी, वांद्रे, कुर्ल्यासह ठिकठिकाणी पावसाचा शिडकाव झाल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे, त्यामुळे एसी, पंखे, कुलरचा वेग मंदावल्याने त्याचा परिणाम विजेच्या मागणीवर झाल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com