ओंदे महाविद्यालयात योग दिनाचा उत्साह

ओंदे महाविद्यालयात योग दिनाचा उत्साह
Published on

विक्रमगड, ता. २३ (बातमीदार) : ओंदे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रविवारी (ता. २१) आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी योगाचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात योगाच्या महत्त्वाविषयी मार्गदर्शनाने करण्यात आली. या वेळी योग प्रशिक्षक प्रा. दिनेश नहिरे यांनी योगाचे आरोग्यदायी फायदे समजावून सांगताना नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते, मानसिक तणाव कमी होतो तसेच एकाग्रता व आत्मविश्वास वाढतो, असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांचे मन, मनगट आणि मेंदू सशक्त करण्यासाठी विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा तसेच श्वसनक्रियांचे प्रात्यक्षिक करून घेतले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत योगासने सादर केली.

कार्यक्रमाचे अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे समन्वयक डॉ. सय्यद जुनेद यांनी प्रास्ताविक केले. सांस्कृतिक विभागाच्या सदस्य प्रा. रोहिणी बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनिल पठाडे यांनी आभार प्रदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com