मृतदेह छातीला कवटाळुन फिरतेय माकडीण

मृतदेह छातीला कवटाळुन फिरतेय माकडीण
Published on

वाघोबा खिंडीत मातृत्वाचे दर्शन
मृत पिल्लाला कवटाळून फिरतेय माकडीण
मनोर, ता. २३ (बातमीदार) ः पालघर-मनोर रस्त्यावरील वाघोबा खिंड परिसरात रस्त्याच्या कडेला मृत पिल्लाला छातीशी घट्ट कवटाळून एक माकडीण बसलेली दिसत होती. तिच्या डोळ्यांतील व्याकुळतेबरोबर पिल्लाला पुन्हा जिवंत करण्याची केविलवाणी धडपड पाहून प्रवाशांचे मन सुन्न झाले.
वाघोबा खिंड परिसरात वाहनचालकांकडून माकडांना खाद्य दिले जाते. फळे, भाजीपाला, इतर पदार्थ मिळाल्याने माकडांच्या टोळ्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात थांबतात. अन्नासाठी रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातांमुळे अनेक माकडांना जीव गमवावा लागला आहे. तर काहींना अपंगत्व आले आहे. अशाच एका मृत पिल्लाला कवटाळून बसलेल्या माकडीणीला पाहून अनेक प्रवाशांचे डोळे नकळत पाणावले. रस्त्याच्या कडेला टाकलेले अन्न मिळवताना या पिल्लाचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
-----------------------------------------
वन्यजीवांना धोका
वन विभागाने घाट परिसरात माकडांना खाद्य देऊ नये, असे सूचना फलक लावले आहेत. तरी वाहनचालकांकडून सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी, वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
------------------------
माकडीण तिच्या मृत पिल्लाला काही दिवस सोडणार नाही. ती त्याला कुशीत घेऊन बसते. पिल्लू जिवंत असल्याची आशा संपल्यावर त्याचा मृतदेह दूर करेल.
- हितेश सोनी, मानद वन्यजीव रक्षक
--------------------------
स्तनात तयार होणारे दूध पिल्लाला पाजण्यासाठी माकडीण प्रयत्न करत असते. परंतु, पिल्लाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर ती नैसर्गिकरीत्या त्याला दूर करते. प्राण्यांमध्येही माणसांसारखेच मातृत्वाचे दु:ख असते.
- राहुल संखे, पशुवैद्यकीय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com