

पेणमधील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा
अनेक दशकांनंतर रस्ते झाले मोकळे
पेण, ता. २३ (वार्ताहर) : पेण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी नगरपालिकेने अतिक्रमणांवर कारवाई करीत शहरातील प्रमुख रस्ते रुंदीकरणाला सुरुवात केली आहे. अनेक दशकांनंतर शहरातील रस्ते मोकळे होत असल्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने रस्ते रुंदीकरणाचा निर्णय घेतला. त्यानुसार शहराच्या नाक्यावरील तसेच पालिकेसमोरील रस्त्यांवरील अतिक्रमित दुकाने, गाळे व इतर बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या वेळी नगर अभियंता सुहास कांबळे, अतिक्रमण नियंत्रण विभागाचे महेश वडके तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
रस्ते रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडीला दिलासा
शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता रस्ते रुंदीकरण ही काळाची गरज बनली होती. अतिक्रमण हटवल्यामुळे रस्ते अधिक सुरक्षित, प्रशस्त आणि वाहतुकीसाठी सक्षम होणार आहेत. तसेच धोकादायक व अतिजीर्ण बांधकामे हटविल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेतही भर पडणार आहे. आगामी काळात शहराच्या विकासासाठी अशाच पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
कोट
अतिजीर्ण व धोकादायक बांधकामे हटविल्याने रस्ते रुंद आणि सुरक्षित होतील. येत्या काही दिवसांत नागरिकांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळेल.
- सुहास कांबळे, नगर अभियंता
कोट
शहराच्या विकासासाठी रस्ते रुंदीकरण आवश्यक आहे. या कामात निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. नागरिकांनीही विकासकामांना सहकार्य करावे.
- रवींद्र पाटील, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.