

‘पोलिस काकांचे’ विद्यार्थ्यांना धडे
अमली पदार्थ, सायबर गुन्ह्यांबाबत कोपरीत जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवतात, असे सर्वसाधारण चित्र असले तरी कोपरीतील विद्यासागर एज्युकेशन स्कूलमध्ये सोमवारी पोलिसच शिक्षकांच्या भूमिकेत दिसले. या वेळी अमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर गुन्ह्यांचे धोके तसेच ऑनलाइन आर्थिक फसवणुकीपासून बचावाचे धडे दिले.
जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त कोपरी पोलिसांच्या जनजागृती कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक नुकसानाबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. तसेच सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांची उदाहरणे देत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला कोपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निशिकांत विश्वकार, पोलिस निरीक्षक प्रदीप केरकर, पोलिस उपनिरीक्षक संजय चव्हाण, स्वाती दुसिंग, सीताराम गावित तसेच जितेंद्र खलाटे उपस्थित होते.
---------------------------------
विद्यार्थ्यांना ‘गृहपाठ’
या कार्यक्रमात मोबाईल संदेशांद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, ओटीपी किंवा बँक खात्याची माहिती इतरांना देणे किती धोकादायक ठरू शकते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेतून घरी गेल्यानंतर आज शिकलेले धडे आईवडिलांना, नातेवाइकांना आणि शेजाऱ्यांनाही सांगावेत, असा ‘गृहपाठ’ विद्यार्थ्यांना देण्यात आला.
--------------------------------------
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. शाळा, पालक, पोलिस यांच्यातील समन्वयामुळे सुरक्षित समाज घडविण्यास मदत होईल.
- अनिलकुमार पांडे, मुख्याध्यापक, विद्यासागर एज्युकेशन स्कूल, कोपरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.