ॲफॅक इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

ॲफॅक इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
Published on

ॲफॅक इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
चेंबूर, ता. २३ : ॲफॅक इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अंबिका कुटीर योग संस्थेच्या प्रशिक्षिका सीमा शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके करून घेतली.
कार्यक्रमादरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहा कुळये यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, तणावमुक्त जीवन जगता येते तसेच वैयक्तिक प्रगतीसाठी योगसाधना अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या वेळी संस्थाचालक मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com