

पनवेल मालमत्ता कर संकलनाचा १०० कोटींचा टप्पा पार
पनवेल, ता. २३ (बातमीदार) ः पनवेल पालिकेच्या कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत मालमत्ता कर संकलनात १०० कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. पालिकेच्या आवाहनाला पनवेलकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आतापर्यंत एकूण ८३ हजार ५२ मालमत्ताधारकांनी १०२ कोटी रुपयांचा कर भरून पालिकेच्या तिजोरीत मोलाचा वाटा उचलला आहे.
आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार, मालमत्ता धारकांसाठी विशेष सवलत जाहीर केली आहे. ३१ जुलैपर्यंत मालमत्ता कर भरल्यास चालू मागणीवर पाच टक्के सवलत, तसेच ऑनलाइन पद्धतीने कर भरल्यास अतिरिक्त दोन टक्के सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेऊन शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी वेळेत कर भरण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मालमत्ता कराची देयके (बिले) तयार करण्यात आली असून त्यांचे वितरण युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांच्या सोयीसाठी मालमत्ता कराचे बिल ऑनलाइन ओफलाइन दोन्ही पद्धतीने भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.