शामनगरमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

शामनगरमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
Published on

शामनगरमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
जोगेश्वरी, ता. २३ (बातमीदार) : जोगेश्वरी पूर्व येथील शामनगर परिसरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, शामनगर यांच्या वतीने मातृपूजन सोहळ्याचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ या संदेशातून आयोजित करण्यात आलेले हे शिबिर शनिवारी (ता. २७) सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ‘शामनगरचा राजा’ व्यासपीठावर आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाला जोगेश्वरी विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले असून, महात्मा गांधी ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तसंकलन करण्यात येणार आहे. रक्तदानाद्वारे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या समाजोपयोगी कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मंडळाचे कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांनीही नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. ‘चला, रक्तदान करूया... जीवनदान देऊया!’ या घोषवाक्यासह परिसरात जनजागृती करण्यात येत असून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com