वृक्ष प्राधिकरणावर तज्ज्ञांचीच नियुक्ती करा

वृक्ष प्राधिकरणावर तज्ज्ञांचीच नियुक्ती करा
Published on

...अन्यथा नवी मुंबईचा हरित ऱ्हास अटळ
मनसेचा महासभेत इशारा
जुईनगर, ता. २३ (बातमीदार) : नवी मुंबई पालिकेच्या महासभेत वृक्ष प्राधिकरण समितीतील नियुक्त्यांच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई यांनी या समितीवर केवळ राजकीय व्यक्तींची वर्णी लावण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेत पर्यावरण संरक्षणासाठी पात्र, अभ्यासू आणि अनुभवी तज्ज्ञांचीच नियुक्ती करण्याची मागणी केली.
विकास आणि पर्यावरणांचा समतोल राखण्याची महत्त्वाची जबाबदारी वृक्ष प्राधिकरण समितीवर असते. त्यामुळे ही समिती केवळ राजकीय पुनर्वसनाचे केंद्र बनू नये. पर्यावरण, वनीकरण आणि उद्यानविद्या क्षेत्रातील खऱ्या अर्थाने पात्र तज्ज्ञांचीच नियुक्ती समितीवर करण्यात यावी, अशी आग्रही मागणी अभिजीत देसाई यांनी केली आहे. यावेळी शहरातील वाढत्या वृक्षतोडीबाबतही चिंता व्यक्त केली गेली. समिती सक्षम आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत नसल्यास शहराचे हरित आच्छादन धोक्यात येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, वृक्ष प्राधिकरण समितीवर पर्यावरण क्षेत्रातील जाणकार आणि अनुभवी व्यक्तींनाच स्थान मिळाले पाहिजे, अन्यथा नवी मुंबईच्या पर्यावरणीय ऱ्हासाला कोणीही रोखू शकणार नाही, असे स्पष्ट मत व्यक्त देसाई यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com