नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या सुनावणी नोटिसांवर स्थगितीची मागणी

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या सुनावणी नोटिसांवर स्थगितीची मागणी
Published on

प्रकल्पग्रस्तांच्या नोटिसांवर स्थगितीची मागणी
आमदार मंदा म्हात्रेंची विधानसभेत लक्षवेधी
तुर्भे, ता. २३ (बातमीदार) ः नवी मुंबई पालिका क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या घरांना व इमारतींना पालिका प्रशासनाकडून बजावण्यात येत असलेल्या सुनावणीच्या नोटिसांमुळे शहरात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मंदा म्हात्रे यांनी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विशेष लक्षवेधी सूचना मांडत, मंदा म्हात्रे यांनी या नोटिसांना तत्काळ स्थगिती देण्याची मागणी केली.
नवी मुंबईतील विविध गावठाण भागांमध्ये पालिका प्रशासनाकडून सुनावणीच्या नोटिसा बजावल्या जात असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती, संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना विधानसभेत मंदा म्हात्रे यांनी म्हणाल्या की, ज्या घरांना नोटिसा दिल्या आहेत. त्यापैकी अनेक घरे ही ७० ते ८० वर्षांपूर्वीची असून ती ऐतिहासिक स्वरूपाची आहेत. शासनाने यापूर्वी या मालमत्तांना अधिकृत मालमत्तापत्रके (प्रॉपर्टी कार्ड) प्रदान केली आहेत. अशा परिस्थितीत, नवी मुंबईच्या विकासासाठी आपल्या जमिनींचा त्याग केलेल्या भूमिपुत्रांनाच आता प्रशासकीय प्रक्रियेच्या जाळ्यात अडकवून मानसिक त्रास दिला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या प्रश्नाकडे राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी करताना त्यांनी सुनावणीची प्रक्रिया तात्पुरती थांबविण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com