बेहरामबागमधील गतिरोधकांची दुरवस्था

बेहरामबागमधील गतिरोधकांची दुरवस्था
Published on

बेहरामबागमधील गतिरोधकांची दुरवस्था
नवीन रिफ्लेक्टरयुक्त गतिरोधकांची मागणी
जोगेश्वरी, ता. २३ (बातमीदार) : जोगेश्वरी पश्चिम येथील बेहरामबाग-काजूपाडा परिसरातील मुख्य रस्त्यावरील गतिरोधकांची मोठ्या प्रमाणात झीज झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले अनेक गतिरोधक अर्ध्याहून अधिक झिजले असून, त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
गतिरोधकांची झीज झाल्यामुळे वाहनचालकांना ते स्पष्टपणे जाणवत नसल्याने अनेक वाहने वेगाने धावत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच बेहरामबाग रोडलगतच्या अंतर्गत रस्त्यांवर काही महिन्यांपूर्वी बसविण्यात आलेले रंगीत प्लॅस्टिकचे गतिरोधकही तुटून किंवा निखळून गेल्याने त्यांचा बहुतांश भाग गायब झाला आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणावर रहदारी आणि पादचाऱ्यांची वर्दळ असल्याने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि इतर वाहनचालक वेगाने वाहन चालवत असल्याने अपघाताची शक्यता वाढल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
संबंधित यंत्रणेने तातडीने पाहणी करून झिजलेले आणि तुटलेले गतिरोधक हटवून त्यांच्या जागी आधुनिक, टिकाऊ व रिफ्लेक्टरयुक्त गतिरोधक बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी वाहनचालकांना गतिरोधक सहज दिसावेत यासाठी परावर्तक पट्ट्यांची व्यवस्था करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com