

उरण, ता. २३ (बातमीदार) : उरण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या माॅन्सून पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी भात पेरणीच्या कामांना वेग दिला असून, शेतशिवारात पुन्हा एकदा शेतीकामांची लगबग पाहायला मिळत आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा पावसाळ्यापूर्वीची शेतीची सर्व तयारी शेतकऱ्यांनी मेमध्येच पूर्ण केली होती. शेतांची मशागत, बांधबंदिस्ती तसेच पेरणीसाठी आवश्यक साहित्याची तयारी करून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, जूनचे तीन आठवडे उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते.
गेल्या दोन दिवसांपासून माॅन्सून सक्रिय झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. पेरणीसाठी राखून ठेवलेले भात बियाणे आणि आवश्यक साहित्य घेऊन शेतकरी शेतात उतरले आहेत. सध्या शेतशिवारात अनेक ठिकाणी भात पेरणीची कामे सुरू असून, शेती परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
यंदा शेतकरी जया, कोमल, कर्जत कोलम, जोरदार, सुवर्णा कोलम, वाडा कोलम, आवणी, पनवेल-२ आणि रत्ना या विविध जातींच्या भात बियाणांची पेरणी करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.