पीएमजीपी पुनर्विकास प्रकल्प; इमारती सक्तीने रिकाम्या करण्यासाठी आज सुनावणी

पीएमजीपी पुनर्विकास प्रकल्प; इमारती सक्तीने रिकाम्या करण्यासाठी आज सुनावणी
Published on

इमारती सक्तीने रिकाम्या करण्यासाठी आज सुनावणी
पीएमजीपी पुनर्विकास प्रकल्प; २९ जूनला इमारत क्र. १३, १४ मधील रहिवाशांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : जोगेश्वरीच्या पीएमजीपी वसाहतीचा म्हाडाकडून पुनर्विकास केला जाणार आहे. मात्र रहिवाशांकडून इमारती रिकाम्या करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने या इमारती सक्तीने रिकाम्या करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्याची पहिली पायरी म्हणून उद्या २४ आणि २५ जूनला सुनावणी घेत रहिवाशांना सक्तीने इमारती रिकाम्या करण्याबाबतच्या कारवाईची माहिती दिली जाणार आहे. त्यानुसार इमारत क्र. १३ आणि १४ मधील रहिवासी सहकार्य करीत नसल्याने त्यांच्यावर प्रथम कारवाई केली जाणार आहे.
पीएमजीपी वसाहतीत चारमजली १७ इमारती असून, त्यामध्ये ९४२ निवासी आणि ४२ अनिवासी असे एकूण ९८४ गाळे आहेत. या इमारती मोडकळीस आल्याने २७ हजार ६२५ चौरस मीटर भूखंडावर असलेल्या या वसाहसतींचा राज्य सरकारच्या मंजुरीने म्हाडा पुनर्विकास करणार आहे. त्यानुसार म्हाडाकडून पर्यायी सदनिका किंवा २० हजार रुपये मासिक भाडे दिले जात आहे. सर्व प्रकारचे सहकार्य करूनही रहिवासी इमारती रिकाम्या करीत नाहीत. आतापर्यंत सुमारे ९५ सदनिका रिकाम्या केल्या आहेत. त्यातच इमारत क्रमांक १३ आणि १४ मधील रहिवाशांकडून कोणतेच सहकार्य मिळत नाही. त्यामुळे म्हाडा कलम ९५ अ नुसार उद्यापासून दोन दिवस सुनवाणी घेऊन कारवाईबाबत माहिती देणार असल्याचे म्हाडाच्या विशेष प्रकल्प कक्ष अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, रहिवाशांना कारवाईची माहिती दिल्यानंतर २९ जूनला पोलिसांच्या मदतीने सक्तीने दोन इमारती रिकाम्या करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्याबाबत संबंधित पोलिस ठाण्याला पत्र दिल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com