पाडकामाची कारवाई रोखण्यासाठी न्यायालयाचा बनावट आदेश

पाडकामाची कारवाई रोखण्यासाठी न्यायालयाचा बनावट आदेश
Published on

पाडकामाची कारवाई रोखण्यासाठी न्यायालयाचा बनावट आदेश
नवी मुंबईत गुन्हा दाखल

नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर होणारी पाडकामाची कारवाई रोखण्यासाठी थेट बेलापूर न्यायालयाचा बनावट स्थगिती आदेश तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाने स्थगिती दिलेली नसताना आदेशाच्या कॉपीत फेरफार करून, न्यायाधीशांची बनावट स्वाक्षरी करून हा खोटा दस्तऐवज तयार करण्यात आला आहे. सीबीडी पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेरूळ येथील सारसोळे गावातील सर्व्हे क्र. ९१ आणि ९२ मधील ६०० चौ. मीटर जागेवर असलेल्या पाच मजली इमारतीबाबत हा संपूर्ण वाद सुरू आहे. हे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत महापालिकेने मालमत्ताधारक बेबीबाई मधुकर ठाकूर यांना २२ एप्रिलला पाडकामाची नोटीस बजावली होती. या नोटिसीविरोधात बेबीबाई ठाकूर यांनी बेलापूर न्यायालयात स्पेशल दिवाणी दावा दाखल करून पाडकामावर कायमस्वरूपी स्थगिती मागितली होती. बेलापूर न्यायालयात या प्रकरणावर ७ मे आणि १२ जून २०२६ रोजी सुनावणी झाली. दोन्ही वेळेस दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) विनायक एच. विश्वास यांनी बेबीबाई ठाकूर यांना पाडकामाविरुद्ध कोणताही हंगामी दिलासा किंवा स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला होता. न्यायालयाने केवळ प्रतिवादींना समन्स बजावण्याचे आदेश दिले होते. दरम्यानच्या काळात, एका अज्ञात व्यक्तीने थेट नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्या व्हॉट्सॲपवर न्यायालयाने पाडकामाला स्थगिती दिल्याच्या बनावट ऑर्डरची पीडीएफ फाइल पाठवली. पालिकेने न्यायालयाच्या मूळ रेकॉर्डची पडताळणी केली असता, कोर्टाने असा कोणताही स्थगिती आदेश दिलाच नसल्याचे उघड झाले.
...
छेडछाड आणि बनावट स्वाक्षरी
न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन तपासणी केली असता उमेश राठोड नामक व्यक्तीने २० मे २०२६ रोजी न्यायालयाच्या मूळ आदेशाची सर्टिफाइड कॉपी काढल्याचे व त्याच आदेशाच्या कॉपीवर फेरफार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. तसेच बेबीबाई ठाकूर यांच्या आडनावावर पेनाने रेघा मारून तिथे ‘तांडेल’ असे लिहिल्याचे, तसेच कोर्टाच्या आदेशाच्या डाव्या बाजूला इंग्रजी मजकूर टाकून स्थगिती मिळाल्याचे भासवण्यात आले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे त्यावर न्यायाधीशांची हुबेहूब बनावट सही करण्यात आली आहे. हा बनावट आदेश महापालिकेच्या नेरूळ वॉर्ड ऑफिसमध्ये (बी वॉर्ड) सादर करून पाडकामाची कारवाई रोखण्याचा कट रचला गेल्याचे निदर्शनास आले आहे.
...
तो नंबर कोणाचा?
महापालिका आयुक्तांना ज्या नंबरवरून कोर्टाची बनावट ऑर्डर कॉपी पाठवण्यात आली तो सागर नाईक या व्यक्तीच्या नावाने असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा व्हॉट्सॲप नंबर नेमका कोणाचा आहे, तो कोणी वापरला आणि या संपूर्ण बनावट आदेशाच्या षड्‌यंत्रामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com