

शाळेच्या बसला डम्परची धडक
भाईंदर, ता. २३ (बातमीदार) : मिरा रोड येथे एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला डम्परने मागून धडक दिल्याची घटना मंगळवारी (ता. २३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या धडकेत बसमधील सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.
मिरा रोड येथील दीपक रुग्णालयासमोरील रस्त्यावरील भाजपच्या जिल्हा कार्यालयासमोर मंगळवारी (ता. २३) सायंकाळी एका डम्परने शाळेच्या बसला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात बसच्या पाठीमागील भाग पूर्णपणे तुटला. बसमध्ये मोजकेच विद्यार्थी असून, ते बसच्या पुढील भागात होते. त्यामुळे ते सुरक्षित राहिले. पोलिसांनी डम्परचालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे पुढील तपास करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.