खारघरमध्ये सिडकोची धडक निष्कासन मोहीम

खारघरमध्ये सिडकोची धडक निष्कासन मोहीम
Published on

खारघरमध्ये सिडकोची धडक निष्कासन मोहीम

खारघर, ता. २३ (बातमीदार) : सिडकोच्या नियंत्रक, अनधिकृत बांधकामे विभागामार्फत मंगळवारी (ता. २३) खारघर नोडमध्ये मोठ्या प्रमाणावर निष्कासन मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान सेक्टर ३० मधील भूखंडावर उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. एकूण २३ अनधिकृत बांधकामांवर सिडकोने या वेळी कारवाई केली.
या मोहिमेत भंगार सामानाची दोन गोदामे, एक सर्व्हिस सेंटर, पाच गॅरेज शेड्स आणि दोन स्टॉल्स असे एकूण १० अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. तसेच सेक्टर २८ ते ३३ आणि सेक्टर ४० परिसरातील रस्त्यालगत उभारण्यात आलेली बिल्डिंग मटेरियलची नऊ अनधिकृत दुकाने, एक गॅरेज आणि तीन स्टॉल हटविण्यात आले.
सिडको प्रशासनाच्या माहितीनुसार, संबंधित बांधकामे सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करून तसेच कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान नियंत्रक, अनधिकृत बांधकामे विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक पोलिस अधिकारी व कर्मचारी, सिडको पोलिस पथक, सिडकोचे सुरक्षा रक्षक तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com