

विरार, ता. २४ (बातमीदार) : ‘सकाळ अवतरण’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘तेजाळणारी ओळ एखादीच होती...’ या लेखाच्या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहून वेठबिगार मुक्तीच्या ऐतिहासिक संघर्षाची आठवण करून दिली असून, ही उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याचे आवाहन केले आहे.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, एकेकाळी आदिवासी, कातकरी आणि वंचित समाजावर लादलेली वेठबिगारीची अमानुष प्रथा श्रमजीवी संघटनेच्या संघर्षामुळे नष्ट झाली. या लढ्याची दखल केवळ देशानेच नव्हे तर संपूर्ण जगाने घेतली. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेकभाऊ पंडित आणि विद्युल्लता पंडित यांनी आदिवासी, गोरगरीब आणि वंचित समाजासाठी केलेले कार्य अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
आजही शिक्षण, आरोग्य, रोजगार, जमीन, वनहक्क आणि सामाजिक न्यायासाठी संघर्ष सुरू असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना अधिक संघटितपणे आणि अधिक ताकदीने काम करण्याचे आवाहन केले. ‘आपण अशा परंपरेचे वारसदार आहोत की ज्या परंपरेने गुलामांची मुक्ती केली. ही परंपरा अधिक बळकट करून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे, ही आपली जबाबदारी आहे,’ असे त्या म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.