

लोकनेते दि. बा. पाटील यांना संग्राम निवासस्थानी अभिवादन
स्मृतिदिनानिमित्त लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती; कार्यकर्तृत्वाला उजाळा
पनवेल, ता. २४ (बातमीदार) ः प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लढवय्ये लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पनवेल येथील संग्राम निवासस्थानी अभिवादन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून दिबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली.
यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपमहापौर प्रमिला पाटील, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, महापालिकेचे माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका दर्शना भोईर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, आदेश ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जनआंदोलनांचा आणि विकास प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक संघर्षाचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या लढ्याचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.