

पावसामुळे विक्रोळीत संरक्षक भिंत कोसळली; रस्ताही खचला
घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) : विक्रोळी पश्चिम येथील जेव्हीएलआरवरील सनसिटी कॉम्प्लेक्सलगतची सुमारे ५० मीटर लांबीची संरक्षक (रिटेनिंग) भिंत मंगळवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे कोसळली. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती पूर्व प्रादेशिक परिमंडळ-३चे पोलिस उपायुक्त अभयसिंग देशमुख यांनी दिली.
पार्कसाईट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गांधीनगर जंक्शनजवळ अस्पेक्ट रियालिटीच्या जागेवर एसआरए प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या मागील बाजूस उभारण्यात आलेली संरक्षक भिंत मुसळधार पावसामुळे रात्रीच्या सुमारास कोसळली. भिंत कोसळल्याने सनसिटी कॉम्प्लेक्सकडे जाणाऱ्या रस्त्याचाही काही भाग खचला असून, परिसरातील वाहतूक आणि नागरिकांच्या हालचालींवर परिणाम झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महापालिकेच्या एस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसर सुरक्षित करत नागरिकांसाठी मार्ग मोकळा करण्याचे काम हाती घेतले. “या दुर्घटनेत कोणतीही हानी झालेली नाही. मात्र, रस्ता खचल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. घटनेची अधिक चौकशी सुरू आहे,” असे अभयसिंग देशमुख यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.