

मोरबे धरणाच्या पाण्याचे न्याय्य वाटप करा
पनवेलमधील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांना प्रशांत ठाकूर यांचे निवेदन
पनवेल, ता. २४ (बातमीदार) ः जिल्ह्यातील मोरबे धरणातील उपलब्ध पाण्याचे न्याय्य, पारदर्शक आणि नियोजनबद्ध वाटप व्हावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे. वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन निवेदन दिले.
मोरबे धरण हे रायगड आणि नवी मुंबई परिसरासाठी महत्त्वाचे जलस्रोत मानले जाते. मात्र, वाढत्या मागणीमुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि वाटपाची गरज निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील शहरीकरणाचा वाढता वेग, औद्योगिक प्रकल्पांचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे पाण्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. विशेषतः पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा परिसरातील अनेक भागांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या वारंवार निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे विविध स्थानिक स्वराज्य संस्था, सिडको, औद्योगिक क्षेत्रे आणि वेगाने वाढणाऱ्या नागरी वसाहतींसाठी स्वतंत्र जलकोटा निश्चित केल्यास भविष्यातील वाद आणि पाणीटंचाई टाळता येऊ शकते, असे प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे.
रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरणाची मागणी
रायगड जिल्ह्यासाठी स्वतंत्र रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी केली आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून पाण्याचे वितरण, उपलब्ध साठ्याचे व्यवस्थापन, भविष्यातील गरजांचे नियोजन आणि स्थानिक नागरिकांच्या पाणी हक्कांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल, असा दावा करण्यात आला.
नैना आणि विमानतळामुळे पाण्याचा ताण वाढणार
पनवेल परिसरात वाढत्या नागरीकरणामुळे पाण्यावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. आगामी काळात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, नवीन गृहनिर्माण संकुले आणि औद्योगिक गुंतवणुकीमुळे पाण्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच दीर्घकालीन जलव्यवस्थापन धोरण राबविण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.