गिरगाव चौपाटीवर कोळी बांधवांसाठी फूड स्टॉल सुरू करण्याची मागणी

गिरगाव चौपाटीवर कोळी बांधवांसाठी फूड स्टॉल सुरू करण्याची मागणी
Published on

गिरगाव चौपाटीवर कोळीबांधवांसाठी फूड स्टॉल सुरू करण्याची मागणी
प्रभादेवी, ता. २४ (बातमीदार) : गिरगाव चौपाटीवर भेळपुरी, पावभाजी आणि अन्य खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सबरोबरच कोळी बांधवांना पारंपरिक मासांहारी खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्वतंत्र फूड स्टॉल्स उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेकडे केली आहे.
मुंबईचे आद्य नागरिक म्हणून ओळख असलेल्या कोळी समाजाचे शहराच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. पारंपरिक मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असला तरी विविध प्रशासकीय धोरणे आणि बदलत्या परिस्थितीमुळे या व्यवसायास अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मनसेने निवेदनात नमूद केले आहे.
मनसेचे मलबार हिल विधानसभा अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी यासंदर्भातील निवेदन पालिकेच्या डी विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले. गिरगाव चौपाटीवर दरवर्षी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले जातात. मात्र, कोळीबांधवांना त्यांच्या पारंपरिक मासांहारी पदार्थांच्या विक्रीसाठी स्वतंत्र जागा दिली जात नसल्याने त्यांना रोजगाराच्या संधींपासून वंचित राहावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दररोज हजारो पर्यटक गिरगाव चौपाटीला भेट देतात. येथे प्रामुख्याने शाकाहारी खाद्यपदार्थ उपलब्ध असल्याने मासांहारी पदार्थांची मागणी असलेल्या पर्यटकांनाही मर्यादित पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे कोळीबांधवांना मासांहारी खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्टॉल उभारण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत महापालिकेने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com