माणगावात तालुकास्तरीय कृषी मेळावा

माणगावात तालुकास्तरीय कृषी मेळावा
Published on

माणगावात तालुकास्तरीय कृषी मेळावा
आधुनिक शेती तंत्रज्ञानाची मिळणार माहिती
माणगाव, ता. २४ (वार्ताहर) : पंचायत समिती माणगाव व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी विशेष कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेती क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, कृषी विभागाच्या विविध योजना, पीक व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
रविवारी (ता. २८) माणगाव येथील कुणबी भवन येथे हा तालुकास्तरीय कृषी मेळावा होणार आहे. मेळाव्यात कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार असून, प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा व अनुभवांद्वारे इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती व्यवस्थापन, फळबाग, भाजीपाला व धान्य पिकांचे नियोजन तसेच शासकीय अनुदान आणि योजनांचा लाभ घेण्याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सभापती विलास शिंदे, उपसभापती मनीषा संदेश मालोरे व पंचायत समिती सदस्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com