अलिबाग नगरपरिषदेत एकल महिला सन्मान दिन

अलिबाग नगरपरिषदेत एकल महिला सन्मान दिन
Published on

अलिबाग नगर परिषदेत एकल महिला सन्मान दिन
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) : अलिबाग नगर परिषद, महसूल विभाग तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग नगर परिषदेत मंगळवारी (ता. २३) एकल महिला सन्मान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या वेळी एकल महिलांचा तुळशीचे रोप, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलिबाग नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षा मानसी म्हात्रे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी सागर साळुंखे, महिला व बालकल्याण सभापती डॉ. साक्षी पाटील, उपसभापती अश्विनी ठोसर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहिता ओव्हाळ तसेच नायब तहसीलदार मानसी पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी एकल महिला, अंगणवाडी सेविका तसेच बचत गटांच्या माध्यमातून प्रगती साधलेल्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मान्यवरांनी एकल महिला सक्षमीकरण विषयावर मार्गदर्शन केले. मानसी म्हात्रे यांनी एकल महिलांनी स्वतःला एकटे समजू नये, प्रशासन आणि समाज त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहिता ओव्हाळ यांनी मिशन वात्सल्य, पॉश ॲक्ट, पीएमएमव्हीवाय, ओएससी सेंटर, सखी निवास, समुपदेशन केंद्र, लाडकी बहीण योजना आणि बालसंगोपन योजनेसह विविध शासकीय योजनांची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com