

कळवेतील गणपती कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी
पेण, ता. २४ (वार्ताहर) : पेण तालुक्याच्या हमरापूर विभागातील कळवे गावातील गणपती कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेक गणेशमूर्तींचे नुकसान झाले. पेण हे गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून संबोधले जात असताना येथे वर्षभर गणपती कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती बनवण्याची लगबग सुरू असते. अशातच जवळपास १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने येथे सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने आज सकाळी हमरापूर परिसरातील कळवे येथील गणपती कारखान्यांमध्ये पाणी शिरल्याने येथील अनेक गणेशमूर्तींचे नुकसान झाले. पावसाचे पाणी कारखान्यांमध्ये येत असल्याचे पाहताच मालकासह कामगारांनी गणेशमूर्ती उचलून दुसऱ्या योग्य स्थळी ठेवण्यात आल्या.
कळवे गावातील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी शिरून मूर्तींचे फार मोठे नुकसान झाले. त्यामुळे शासनाने याचा विचार करून त्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.