एकल महिला दिनानिमित्त नवी मुंबईत विविध उपक्रमांचे आयोजन

एकल महिला दिनानिमित्त नवी मुंबईत विविध उपक्रमांचे आयोजन
Published on

एकल महिला दिनानिमित्त नवी मुंबईत विविध उपक्रमांचे आयोजन
नेरूळ, ता. २४ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे शहरातील आठ ठिकाणी विविध जनजागृती व सक्षमीकरणपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महापौर सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमांना एकल महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. तसेच केंद्र व राज्य शासन तसेच महापालिकेच्या रोजगार, स्वयंरोजगार आणि उपजीविकाविषयक विविध योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.
बचत गटांचे महत्त्व, त्यांची स्थापना प्रक्रिया आणि आर्थिक स्वावलंबनासाठी त्यांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी एकल महिलांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षाही जाणून घेण्यात आल्या.
बेलापूर, सारसोळे, वाशी, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा येथील केंद्रांवर आयोजित कार्यक्रमांना विविध लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या सूचनेनुसार आयोजित या उपक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. समाजविकास विभाग, समाजसेवक आणि समूह संघटकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com