मुसळधार पावसाने संरक्षण भिंत कोसळली

मुसळधार पावसाने संरक्षण भिंत कोसळली
Published on

मुसळधार पावसाने संरक्षक भिंत कोसळली
घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) ः एल विभागातील हनुमान कंपाउंड, सुंदरबाग येथे संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
मध्यरात्री सुमारे तीनच्या सुमारास ही संरक्षक भिंत अचानक कोसळली. भिंतीलगत झोपड्यांचा परिसर असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, रात्रीच्या वेळी भिंत कोसळूनही कोणालाही इजा झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
काल रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले, तर काही ठिकाणी रस्ते खचणे आणि माती घसरण्याच्या घटनाही घडल्या आहेत. हनुमान कंपाउंड येथील संरक्षक भिंत कोसळल्याची माहिती स्थानिक रहिवासी क्रांती राणे यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com