रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) ः असल्फा येथे राहुल चव्हाण मित्रपरिवाराच्या वतीने रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल १८७ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा आकर्षक भेटवस्तू आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याची भावना आयोजक राहुल चव्हाण यांनी व्यक्त केली.
राहुल चव्हाण मित्रपरिवाराच्या वतीने दरवर्षी नियमितपणे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या विचाराने प्रेरित होऊन समाजाप्रती आपली जबाबदारी जपत हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. यावर्षीही मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून या सामाजिक कार्याला भक्कम पाठबळ दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com