पावसामुळे विजेच्या मागणीत ३० टक्के घट

पावसामुळे विजेच्या 
मागणीत ३० टक्के घट
Published on

पावसामुळे विजेच्या
मागणीत ३० टक्के घट
मुंबई, ता. २४ : मुंबईसह परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची विजेची मागणी घटली आहे. पावसाआधी ४,५०० मेगावाॅटपर्यंत नोंदली जाणारी मागणी आज ३,३०० मेगावाॅटपर्यंत कमी झाली आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने एसी, पंखे, कुलरचा वापर कमी झाल्याने विजेच्या मागणीत घट झाली.
पावसाने ओढ दिल्याने मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ४,५०० मेगावाॅटहून अधिक विजेची मागणी नोंदली जात होती. ९ जून रोजी सर्वाधिक ४६१० मेगावाॅट एवढी विजेची मागणी नोंदली होती; मात्र मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाने मुंबईचा पारा २७ अंशापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत जवळपास १२०० मेगावाॅटहून अधिक घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com