खासगी रुग्णालयांच्या लाखोंच्या खर्चाला चाप

खासगी रुग्णालयांच्या लाखोंच्या खर्चाला चाप
Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २८ : खासगी रुग्णालयांमधील गगनाला भिडलेले वैद्यकीय बिल आणि अत्यावश्यक उपचारांसाठी होणारी आर्थिक ओढाताण या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची रुग्णालये सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांसाठी खरी आरोग्य संजीवनी ठरत आहेत. वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय, नेरूळचे माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय आणि ऐरोली रुग्णालयात सुरू करण्यात आलेला अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, नवजात शिशू देखभाल कक्ष आणि मोफत डायलिसिस सुविधेमुळे रुग्णांच्या उपचारांवरील लाखो रुपयांचा खर्च वाचत आहे.

खासगी रुग्णालयांतील महागड्या उपचारांच्या तुलनेत पालिकेच्या मोफत व अल्पदरातील आरोग्य यंत्रणेमुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांवरचा आर्थिक ताण पूर्णपणे दूर झाला आहे. अचानक उद्भवलेले गंभीर आजार किंवा किडनी विकारासारख्या दीर्घकालीन उपचारांमुळे अनेक कुटुंबे कर्जाच्या खाईत ढकलली जातात. मात्र पालिका आयुक्त व आरोग्य विभागाच्या नियोजनामुळे नवी मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील गरजू रुग्णांना अत्यंत दर्जेदार आरोग्यसेवा मोफत मिळत असून, त्यांचे लाखो रुपये वाचत आहेत.

प्रमुख आरोग्य सुविधांचा विस्तार
- पालिकेने वाशी येथे ५० खाटांचे (एकूण शहरात ८५ खाटांचे) अत्याधुनिक डायलिसिस केंद्र सुरू केले आहे. नियमित डायलिसिसची गरज असणाऱ्या शेकडो रुग्णांना मोफत उपचार मिळत आहेत.
- पालिकेच्या वाशी आणि नेरूळ रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १६ हून अधिक खाटांचे सुसज्ज एनआयसीयू व आयसीयू कक्ष कार्यरत आहेत. व्हेंटिलेटर, मॉनिटर्स आणि प्रशिक्षित बालरोगतज्ज्ञांमुळे गंभीर रुग्णांवर वेळेत उपचार होत आहेत.
- शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत थेट वस्त्यांमध्ये गरोदर मातांची देखभाल, बालकांचे लसीकरण, रक्त तपासणी आणि आवश्यक औषध पुरवठा केला जात आहे.
- रुग्णालयात दाखल रुग्णांना पॅथॉलॉजी चाचण्या, सीटी स्कॅन, एक्स-रे आणि आवश्यक औषधे रुग्णालयातच मोफत उपलब्ध करून दिल्याने बाहेरील वैद्यकीय व प्रयोगशाळेचा खर्च टळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com