ठाणे रिंग मेट्रोविरोधात नागरिकांचा एल्गार

ठाणे रिंग मेट्रोविरोधात नागरिकांचा एल्गार
Published on

ठाणे रिंग मेट्रोविरोधात नागरिकांचा एल्गार

ठाणे, ता. २९ : शहराभोवती प्रस्तावित असलेल्या इंटिग्रल रिंग मेट्रोच्या प्रकल्पाविरोधात नागरिकांनी आंदोलनाची हाक दिली आहे. रिंग मेट्रोच्या मुद्यावर नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी रविवारी (ता. ३०) स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी ठाणेकरांना केले आहे.
ठाणे शहरातील विकास प्रकल्पांबाबत निर्णय घेताना सर्वसामान्य नागरिकांच्या मतांचा विचार झाला पाहिजे, अशी भूमिका या मोहिमेच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. आता सर्वसामान्य नागरिकांना गृहीत धरून चालणार नाही. आपले शहर, आपला आवाज आणि प्रश्न विचारण्याचा आपला अधिकार, असा संदेश देत नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात रविवारी सकाळी १० वाजता आशर इन्फिनिटी, प्रशांत कॉर्नरजवळ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे. नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होत रिंग मेट्रोविरोधातील आपला आक्षेप नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्वाक्षरी मोहिमेसाठी सहभागी होणाऱ्या नागरिकांनी काळ्या रंगाचा ड्रेसकोड पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणतेही राजकीय बॅनर अथवा झेंडे आणू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सहभागातून पक्षविरहित आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com