भाजपने जरांगे यांना रेड कार्पेट टाकले, तर भाजप संपणार - प्रा. लक्ष्मण हाके

भाजपने जरांगे यांना रेड कार्पेट टाकले, तर भाजप संपणार - प्रा. लक्ष्मण हाके
Published on

जरांगे यांना रेड कार्पेट टाकू नये!
...तर भाजप संपेल; प्रा. हाके यांची टीका

वाशी, ता. २९ (बातमीदार) ः मनोज जरांगे हे जात वर्चस्वाची भाषा बोलत असून ते मुख्यमंत्र्यांचा अपमान करीत आहे. अशा जरांगे यांना भाजपने रेड कार्पेट टाकले, तर भाजप संपून जाईल, अशी टीका ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी शनिवारी (ता. २९) वाशी येथे पत्रकार परिषदेत केली. ओबीसी नेत्यांना लक्ष्य करणाऱ्या जरांगे यांचे मुख्यमंत्री एवढे लाड का करीत आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पुण्यातून १ सप्टेंबरला आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजदेखील सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हाके म्हणाले, की कुणीही कुणबी प्रमाणपत्र काढा आणि ओबीसींना गाडा असा प्रकार चालू आहे. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त होणार आहे. यातून पंचायत राज आणि शिक्षण यामधील ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा डाव आहे. यामुळे नोकरीमधील आरक्षण संपुष्टात येणार आहे. सरकारने २२ लाख कुणबी प्रमाणपत्र वाटल्याने ओबीसी उद्ध्वस्त झाला आहे.
कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी मोडी लिपीचा बेकायदा वापर केला जात आहे. हा मागील दरवाजाने ओबीसीमध्ये येण्याचा डाव आहे. जरांगेंची आरक्षणाची मागणी असेल, तर त्यांनी मागासवर्ग आयोगाला सामोरे जावे. केंद्र सरकारने १०३वी घटना दुरुस्ती करून आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना ईडब्ल्यूएस (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) आणि ईसीबीसी आरक्षण १० टक्के आरक्षण दिले आहे. गोरगरिबांना आरक्षण द्या, अशी मागणी करणारे जरांगे यांनी यातून आरक्षण घ्यावे. जरांगे यांना ईडब्ल्यूएस समजावून सांगण्यास सरकार कमी पडत आहे. जरांगे यांनी जात पडताळणी समिती बरखास्त करण्याची मागणी करणे योग्य नाही. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाची अंमलबजावणी चालू झाली. त्यामुळे त्यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी बोलले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com