नैसर्गिक तलावातच कृत्रिम तलाव !

नैसर्गिक तलावातच कृत्रिम तलाव !
Published on

गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन
मिरा-भाईंदर पालिकेचा पर्यावरण विभागाला प्रस्ताव
भाईंदर, ता.३० (बातमीदार): मिरा-भाईंदर पलिकेच्या कृत्रिम तलावातील गणेश मूर्तींच्या विसर्जनावरून मोठा वाद झाला होता. याच पार्श्वभूमीवर नैसर्गिक तलावातील कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनासाठी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव पालिकेने राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाला दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार ४२ ठिकाणी कृत्रिम तलाव केले होते. परंतु, तलावांच्या अव्यवस्थेवरून भक्तांनी मूर्तींचे विसर्जन करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. या वादातून काहीजणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे पूर्वानुभवामुळे पालिकेने राज्य सरकारला शहरातील अकरा नैसर्गिक तलावातच स्वतंत्र कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केल्याचा प्रस्ताव पाठवला आहे. या तलावात तळाशी टार्पोलीन अंथरल्यास नैसर्गिक तलावात पाणी जाणार नाही. तसेच विसर्जनानंतर गाळ बाहेर काढता येणार आहे. त्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. तसेच सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होईल, असा दावा केला आहे.
---------------------
आगामी गणेशोत्सवात कृत्रिम कप्यांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे. याबाबत पर्यावरण विभागाच्या आदेशानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा-भाईंदर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com