वातानुकुलित यंत्रणा ठप्प

वातानुकुलित यंत्रणा ठप्प
Published on

परिवहनमंत्र्यांना घामाच्या धारा
लता मंगेशकर नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद

भाईंदर, ता. ३० (बातमीदार) : शहरातील लता मंगेशकर नाट्यगृहात गणेश दर्शन स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी वातानुकूलित यंत्रणा बंद पडली. या प्रकाराने संतापलेल्या परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी चांगल्या वास्तूची देखभाल होत नसेल तर आयुक्त, महापौरांना मनी ऑर्डर पाठवण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले आहे.
दहिसर चेक नाक्याजवळ महापालिकेने सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी नाट्यगृहाची देखणी वास्तू उभारली आहे; परंतु नाट्यगृहाची देखभाल दुरुस्तीकडे पालिकेच्या दुर्लक्षामुळे नाट्यरसिकांमध्ये नाराजी आहे. नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसह कलाकारांना मनस्ताप सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे, शनिवारी (ता. २९) रात्री ही यंत्रणा बंद झाल्याने दुरुस्ती करण्यात आली होती; मात्र रविवारी गॅस गळतीने पुन्हा वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने तुडुंब भरलेल्या नाट्यगृहातील प्रेक्षक घामाघूम झाले होते.
---------------------------
पर्यायी व्यवस्था करा!
जूनमध्ये एका मराठी नाटकाचा प्रयोग सुरू असताना वातानुकूलित यंत्रणा बंद पडली होती. त्या वेळी संतापलेल्या प्रेक्षकांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होती. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रयोग सुरू केला होता; पण वारंवार अशा घटना होत असल्याने पालिकेने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com