वर्षा मॅरेथॉनमध्ये प्रवीण, रवीना अव्वल

वर्षा मॅरेथॉनमध्ये प्रवीण, रवीना अव्वल
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : ‘धाव प्रगतीची... गतिशील ठाण्याची’ या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या ३२व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या खुल्या गटात कोल्हापूरचा प्रवीण कांबळे, तर महिलांच्या खुल्या गटात नाशिकची रवीना गायकवाड विजेते ठरले. प्रवीणने २१ किमीचे अंतर एक तास सात मिनिटे २१ सेकंदांत, तर रविनाने एक तास २६ मिनिटे चार सेकंदांत पूर्ण केले. सुमारे ३० हजार धावपटूंच्या सहभागाने आज (ता. ३०) मॅरेथॉन उत्साहात पार पडली.

ठाणे महापालिकेत महापौर, पदाधिकारी आणि नगरसेवक विराजमान झाल्यानंतर यावर्षी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी झेंडा दाखवला. ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेत एकूण १४ गट होते. विजेत्यांना एकूण ११ लाखांची रोख बक्षिसे देण्यात आली. २१ किमीच्या मुख्य शर्यतीतील विजेत्याला एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

मॅरेथॉनच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आणि भारतीय नौदलात वर्ग-१ अधिकारी म्हणून निवड झालेल्या ज्ञानेश आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि पत्रकारांसाठीही स्वतंत्र शर्यती घेण्यात आल्या. सिनेकलावंतांनीही एक किलोमीटरच्या शर्यतीत सहभाग घेत धावपटूंचा उत्साह वाढवला.

विविध गटांतील अनुक्रमे पहिले तीन विजेते
पुरुष खुला गट २१ किमी
प्रवीण कांबळे (कोल्हापूर), राजन यादव (पुणे), कालिदास हिरवे (नाशिक).

महिला खुला गट - २१ किमी
रवीना गायकवाड (नाशिक), तेजस्विनी लामकाने, साक्षी कसबे (पुणे)

पुरुष - १८ वर्षांवरील १० किमी
अभिनंदन सूर्यवंशी, सोहम शिंदे

महिला - १६ वर्षांवरील १० किमी
तृप्ती नागरकर, प्रतीक्षा राज, गौरी राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com