आंबिवली परिसरात ‘फटका गँग’ पुन्हा सक्रिय

आंबिवली परिसरात ‘फटका गँग’ पुन्हा सक्रिय
Published on

कल्याण, ता. ३१ (वार्ताहर) : रेल्वे रुळांवर सक्रिय असलेल्या ‘फटका गँग’च्या कारवाया पुन्हा एकदा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या एका घटनेत, समाजकंटकांनी राज्यराणी एक्स्प्रेसच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या एका प्रवाशाच्या हातावर काठीने वार करून त्याचा फोन खाली पाडला. या घटनेनंतर लगेचच, तरुणाने धावत्या रेल्वेमधून उडी मारली आणि चोरांचा पाठलाग केला; मात्र संशयित दुचाकीवरून पसार झाले. कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुण परमानंद शांताराम आव्हाड हा घाटकोपर येथील मित्राच्या वाढदिवसाला जाण्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये बसला होता. कल्याण स्थानकात उतरण्यासाठी तो टिटवाळा स्थानक ओलांडल्यानंतर ट्रेनच्या दरवाजाजवळ उभा राहिला. ​आंबिवली स्थानकाजवळ रेल्वे पोहोचताच तिचा वेग मंदावला. त्याच वेळी रेल्वे उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या तीन मुलांपैकी एकाने परमानंदच्या हातावर काठीने जोरात प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मोबाईल हातातून निसटून रेल्वे रुळांलगत पडला, जो खाली उभ्या असलेल्या चोरांनी तातडीने उचलला आणि पळ काढला.

​परमानंदने कसलाही विचार न करता धीम्या गतीच्या रेल्वेमधून खाली उडी मारली आणि चोरांच्या मागे धाव घेतली. मात्र, संशयित दुचाकीवर बसून पसार झाले. पाठलाग करताना परमानंदचा पाय मुरगळला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला पुढे जाता आले नाही. ​जखमी अवस्थेतच परमानंदने रेल्वे पोलिस ठाणे गाठून अधिकृत तक्रार नोंदवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com