रेल्वेमधील दागिने चोरणारी जोडगोळी गजाआड

रेल्वेमधील दागिने चोरणारी जोडगोळी गजाआड
Published on

​कल्याण, ता. २८ (बातमीदार) : धावत्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवेश करून महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने लांबविणाऱ्या एका सराईत जोडगोळीला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे. हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ''ओल्या पार्टी''दरम्यान बेसावध असलेल्या या चोरट्यांवर पोलिसांनी अचानक झडप घालून त्यांना बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

​दीपक चव्हाण आणि भोला चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या एका चोरीच्या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या दोन्ही चोरांच्या हालचाली रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे कैद झाल्या होत्या. या फुटेजच्या आधारे लोहमार्ग गुन्हे शाखेने कसून शोधमोहीम सुरू केली होती. ​चोरीच्या पैशातून मौजमजा करण्यासाठी हे दोन्ही संशयित कल्याण रेल्वे स्थानकासमोरील एका नामांकित हॉटेलमध्ये पार्टी करणार असल्याची गोपनीय माहिती खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळाली. या माहितीची खात्री पटताच पोलिसांच्या पथकाने हॉटेल परिसरात सापळा रचला. ​आरोपी हॉटेलमध्ये बेसावधपणे दारूच्या पार्टीत मग्न असतानाच पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्यांच्यावर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com