सौर, पवन हरित ऊर्जेची मागणी वाढणार

सौर, पवन हरित ऊर्जेची मागणी वाढणार
Published on

सौर, पवन हरित ऊर्जेची मागणी वाढणार
२०३०पर्यंत ४३ टक्के वीज हरित प्रकल्पांतून घेणे बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३० : राज्यातील वीज वितरण कंपन्यांना २०३०पर्यंत एकूण वीज वितरणाच्या ४३ टक्के वीज हरित ऊर्जा प्रकल्पांतून घेणे बंधनकारक होणार आहे. सौर, पवन आणि लघु जलविद्युत प्रकल्पांतून ही वीज खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात हरित ऊर्जेची मागणी वाढणार आहे.
सध्या राज्यातील ७० टक्क्यांहून अधिक वीज औष्णिक प्रकल्पांतून घेतली जाते; मात्र पर्यावरण संवर्धनासाठी हरित ऊर्जेला प्रोत्साहन दिले जात आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगानेही हरित ऊर्जा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार सध्या वीज वितरण कंपन्यांना एकूण वितरणाच्या ३५ टक्के वीज हरित ऊर्जा प्रकल्पांतून घेणे आवश्यक आहे. हे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढवून २०३०पर्यंत ४३ टक्क्यांवर नेले जाणार आहे.
----
विजेची मागणी वाढती
राज्यातील विजेची मागणी सातत्याने वाढत आहे. जूनमध्ये राज्यात विक्रमी ३१ हजार मेगावॉट विजेची मागणी नोंदविण्यात आली होती. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सध्या औष्णिक प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत आहे. भविष्यात मात्र हरित ऊर्जा प्रकल्पांचा वाटा वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com