

विविध रूपांतील गणरायाच्या मूर्तींनी सजले स्टॉल्स
बुकिंगसाठी नवी मुंबईकरांची गर्दी
वाशी, ता. ८ (बातमीदार) ः गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नवी मुंबईतील विविध भागांमध्ये मूर्तींचे स्टॉल्स सजले आहेत. आपल्या लाडक्या गणरायाची मूर्ती वेळेत आरक्षित करण्यासाठी सध्या भक्तांची स्टॉल्सवर मोठी गर्दी दिसून येत आहे. यावर्षी गणेशमूर्तींमध्येही विविधता पाहायला मिळत आहे.
दरवर्षीपेक्षा यंदा शहरात नावीन्यपूर्ण गणेशमूर्ती दाखल झाल्या आहेत. मूर्ती तयार करताना मातीचे उपरणे, धोतर, शेला, फेटा अशा स्वरूपातील वस्त्रांचा वापर करून त्यांना आकर्षक रंगरंगोटी केली जात आहे. तर, कापडी पोशाखातील गणेशमूर्तींनाही ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. यंदा गणेशमूर्तींच्या विविध आकर्षक रूपांमुळे नागरिकांना आपल्या आवडीची मूर्ती निवडण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. गणेशोत्सव जवळ येत असल्याने आगामी दिवसांत मूर्ती बुकिंग आणि खरेदीसाठी गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे मूर्तिकार सुनील मोरे यांनी सांगितले.
राजस्थानी मूर्तींना विशेष पसंती
शहरात राजस्थानच्या कलाकारांनी घडविलेल्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या मूर्ती स्वस्त असल्यामुळे नागरिकांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शहरातील विविध स्टॉल्सवर गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. मूर्तींची किंमत आकारानुसार दोन हजार रुपयांपासून १५ हजार रुपयांपर्यंत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.