वाघाडी-कांदरवाडी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

वाघाडी-कांदरवाडी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
Published on

साचलेल्या पाण्यातून प्रवासाची वेळ
वाघाडी ते कांदरवाडी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मनस्ताप
कासा, ता.३१(बातमीदार)ः वाघाडी ते कांदरवाडी गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दोन वर्षांपासून दुरवस्था आहे. अशातच पावसाळ्यात खड्ड्यांमधील साचलेल्या पाण्याने प्रवास अधिकच बिकट झाला आहे.
वाघाडी ते कांदरवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याखालील सिमेंटचा पाईप तुटल्याने नागरिकांना अर्ध्या रस्त्यातून मार्ग काढावा लागत आहे. या प्रकाराने मार्गावरील वाहतूक कायमची बंद होण्याची भीती आहे. खराब रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध तसेच बाजारपेठ व शासकीय कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही फटका बसत आहे. हा परिसर जंगलाने व्यापलेला असल्याने सर्पदंश किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात वेळेत पोहोचणे कठीण होत आहे. तसेच रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे काही गर्भवती महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
---------------------
रास्तारोकोचा इशारा
कांदरवाडी येथील समाज मंदिरात प्रशासकीय अधिकारी, बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधींना निवेदन देण्याचे ठरवण्यात आले. त्यानंतर दहा दिवसांत रस्त्याची दुरुस्ती झाली नाहीतर ९ सप्टेंबर रोजी रास्ता रोको अथवा भात रोपणी आंदोलनाचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
--------------------
सणासुदीचे दिवस सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने रस्त्याची दुरुस्ती करावी. अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
- अॅड. विराज गडग, समाजसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com