सेवा रस्त्यावर बेकायदा खाऊ गल्ली

सेवा रस्त्यावर बेकायदा खाऊ गल्ली
Published on

कळवा, ता. ३१ (बातमीदार) : खारेगाव, पारसिकनगर येथील नाईंटी फूट रस्त्यावर सध्या बेकायदा फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. रस्त्याच्या एका बाजूला बेकायदा खासगी बस पार्किंग, तर दुसऱ्या बाजूला सेवा रस्त्यावर सध्या बेकायदा खाऊ गल्ली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सायंकाळी सेवा रस्त्यावर खाऊ गल्ली भरत असल्याने दुकानदारांचे अतिक्रमण वाढत आहे. महापालिका प्रशासनाने बेकायदा दुकानांवर कारवाई करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ज्येष्ठ नागरिकांना चालता यावे, यासाठी नाईंटी फूट रस्त्याच्या कडेला सेवा रस्ता तयार करण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केले आहे; परंतु नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य न देता फेरीवाल्यांनी बेकायदा खाद्यपदार्थांची दुकाने थाटली आहेत. तसेच काही व्यक्तींनी फेरीवाल्यांच्या संघटनेची स्थापना केल्याने भविष्यात या रस्त्यावर आणखी फेरीवाल्यांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यावर फेरीवाल्यांना हटवण्याऐवजी त्यांना बस्तान मांडण्यासाठी जागा दिली आहे. त्यामुळे फेरीवाला धोरणाची पायमल्ली होत आहे.


सेवा रस्त्यावरून दुकानदार व फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने सायंकाळी चालताना आम्हा ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे या रस्त्यावर भरलेली खाऊ गल्ली बंद करून हा रस्ता मोकळा करावा.
- मुकुंद तांबे, ज्येष्ठ नागरिक, पारसिकनगर, खारेगाव

खाऊ गल्लीला महापालिकेने कोणतीही परवानगी दिलेली नाही. याआधी या दुकानांवर कळवा प्रभाग समितीच्या वतीने कारवाई करण्यात आली होती. पुन्हा बेकायदा दुकानांवर कारवाई केली जाईल.
- ललिता जाधव, सहाय्यक आयुक्त, कळवा प्रभाग समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com