सोनारपाड्यातील मारहाणप्रकरणी आगरी समाज आक्रमक

सोनारपाड्यातील मारहाणप्रकरणी आगरी समाज आक्रमक
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ : सोनारपाडा येथे ठाकूर कुटुंबातील महिलांना महिला बाउन्सरकडून कथित मारहाण झाल्याच्या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आगरी समाजातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. संबंधित विकसकासह प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात झालेल्या बैठकीत करण्यात आली. पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्यास ३ सप्टेंबरला डोंबिवलीच्या सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयावर हजारो भूमिपुत्रांचा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.

मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनारपाडा येथे जमिनीच्या ताब्यावरून ठाकूर कुटुंबीय आणि संबंधित विकसक यांच्यात वाद सुरू आहे. या वादातून विकसकाच्या वतीने जेसीबी, महिला बाउन्सर आणि अन्य व्यक्तींना पाठवून घराची नासधूस करण्यात आली. तसेच महिलांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. घटनेचे काही व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी आणि समाजबांधवांची बैठक शनिवारी झाली. संबंधित विकसकावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. जमिनीचा व्यवहार झाला असला तरी प्रत्यक्ष ताब्याचा प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवणे आवश्यक आहे. न्यायालयीन आदेशाशिवाय घर खाली करण्यासाठी बळाचा वापर करणे योग्य नसल्याचे काळू कोमस्कर यांनी सांगितले. नवी मुंबईतील १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनीही घटनेचा निषेध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com