गणेशपुरीत तंत्रज्ञानातून संवादाचे नवे दालन

गणेशपुरीत तंत्रज्ञानातून संवादाचे नवे दालन
Published on

वज्रेश्वरी, ता. १ (बातमीदार) : विशेष गरजा असलेल्या मुलांना व व्यक्तींना संवाद साधणे अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने गणेशपुरी ग्रामपंचायतीच्या वतीने ‘जेलो एएसी ॲप’ संदर्भात जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या माध्यमातून झालेल्या कार्यशाळेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यशाळेत भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईचे प्रा. रवी, प्रा. अजंता, विद्या मॅडम आणि मोनिश चव्हाण यांनी उपस्थितांना ‘जेलो एएसी ॲप’ची सविस्तर माहिती दिली. संवाद साधण्यात अडचण येणाऱ्या मुलांना व व्यक्तींना या ॲपच्या माध्यमातून संवाद साधणे कसे सुलभ होऊ शकते, त्याचा वापर कसा करावा आणि त्याचे फायदे कोणते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला गणेशपुरी गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच जागरूक नागरिकांनी सहभाग नोंदविला.  या कार्यक्रमाला गणेशपुरीचे सरपंच संदीप खिराडे, ग्रामपंचायत सदस्य राहुल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते रोहित गावडे, नकुल सुतार, कृष्णा हेगडे, मनमोहन यादव, गणेश चव्हाण, प्रदीप जाधव, उमेश महाडिक, शंकर कराळे, करण घाडी, गौतम कडव, राहुल मरले आणि शरद गोहिल यांची उपस्थिती होती.

गणेशपुरीसारख्या ग्रामीण भागात भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या माध्यमातून विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त अशा आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पोहोचणे ही कौतुकास्पद बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. ‘तंत्रज्ञानातून संवाद, संवादातून समान संधी’ या संकल्पनेतून विशेष गरजा असलेल्या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी गणेशपुरीतून सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com