दहीहंडी सराव शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

दहीहंडी सराव शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on

दहीहंडी सराव शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
विक्रोळी पार्कसाईटमध्ये शंभरहून अधिक गोविंदा पथकांचा सहभाग

घाटकोपर, ता. ३१ (बातमीदार) ः ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अनिल निर्मळे यांच्या वतीने रविवारी विक्रोळी पार्कसाईट येथे दहीहंडी सराव शिबिर २०२६चे आयोजन करण्यात आले. या सराव शिबिराला गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे, वर्षा कदम तसेच युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांनी उपस्थित राहून गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला.
शिबिरात मुंबईतील शंभरहून अधिक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. गोविंदांनी सरावादरम्यान चार, पाच आणि सहा थरांचे मनोरे रचत दमदार सलामी दिली. थरांची उंची वाढत असताना उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत गोविंदांचा उत्साह वाढविला.
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांना सरावासाठी सुरक्षित आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोविंदा पथकांना आयोजकांच्या वतीने आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. दहीहंडीच्या पारंपरिक उत्सवाला क्रीडा कौशल्याची जोड देणाऱ्या या सराव शिबिरामुळे विक्रोळी पार्कसाईट परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com