

अष्टविनायक गणेश मंदिर शिखरावरील पाच पंचधातू कलशांची चोरी
घाटकोपर, ता. ३१ (बातमीदार) ः घाटकोपर पश्चिमेतील भीमनगर परिसरातील अष्टविनायक गणेश मंदिराच्या शिखरावर प्रतिष्ठापित करण्यात आलेले पंचधातूचे पाच कलश अज्ञात व्यक्तींनी चोरी करून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एक मोठा आणि चार लहान अशा एकूण पाच कलशांचा समावेश आहे. ही घटना २६ ऑगस्टच्या रात्री ते २७ ऑगस्टच्या पहाटेदरम्यान घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ओम अष्टविनायक फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील बाबुराव चव्हाण यांनी घाटकोपर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज सादर करून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करावा तसेच तातडीने सखोल आणि निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी केली आहे. मंदिराच्या शिखरावर प्रतिष्ठापित करण्यात आलेले हे कलश १२ ऑगस्ट २०२५ला श्रावण महिन्यातील अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक स्थापित करण्यात आले होते. त्यातील मोठा कलश मंदिराच्या शिखरावर सुमारे १४ फूट उंचीवर होता. त्यामुळे हा प्रकार केवळ धातूच्या वस्तूंच्या चोरीपुरता मर्यादित नसून मंदिराचे पावित्र्य, धार्मिक परंपरा आणि भाविकांच्या श्रद्धेशी संबंधित असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. घटनेच्या कालावधीत आपण रक्षाबंधनानिमित्त पुणे येथे गेलो होतो. त्यावेळी दूरध्वनीवरून मंदिरातील कलश चोरीला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.