

मिरा-भाईंदरची दिल्लीत दखल
कचरा व्यवस्थापन प्रणालीचे सादरीकरण
भाईंदर, ता.३१ (बातमीदार)ः मिरा-भाईंदर शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी पालिकेच्या डिजिटल वेस्ट मॅनेजमेंट प्रणालीची माहिती ‘स्वच्छ भारत मिशन-शहरी २.०’ अंतर्गत राष्ट्रीय सल्लामसलत कार्यशाळेत घेण्यात आली. यासाठी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना नवी दिल्लीत निमंत्रित करण्यात आले होते.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कचरा संकलन, वाहतूक, देखरेख, व्यवस्थापन पारदर्शक व परिणामकारक करण्यासाठी पालिकेने डिजिटल वेस्ट मॅनेजमेंट प्रणाली विकसित केली आहे. महाराष्ट्रासह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ही प्रणाली मार्गदर्शक ठरत आहे. एवढेच नाहीतर केंद्र सरकारच्या ‘मॉडेल क्लीन सिटीज’ उपक्रमातही दखल घेण्यात आली आहे. दिल्लीत गुरूवारी (ता.२७) झालेल्या कार्यशाळेत राधाबिनोद शर्मा यांना डिजिटल वेस्ट मॅनेजमेंट प्रणालीची माहिती देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्रातून सहभागी झालेले एकमेव पालिका आयुक्त होते. या बैठकीत पालिका आयुक्तांनी डिजिटल कचरा व्यवस्थापन प्रणालीसह ‘झिरो डम्पिंग मुंबई महानगर प्रदेश’च्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेचे देखील सादरीकरण केले.
-------------------------
राष्ट्रीय कार्यशाळेत वैज्ञानिक घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षित स्वच्छता व्यवस्था, पाण्याचे व्यवस्थापन, स्थानिक स्वराज्य संस्थांची संस्थात्मक क्षमता वाढवणे, आवश्यक मनुष्यबळ, आर्थिक संसाधने उपलब्ध करणे, आदी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मिरा-भाईंदर पालिकेसाठी ही बाब महत्त्वाची आहे.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.