बंदुकीच्या धाकाने विकसकाचे अपहरण

बंदुकीच्या धाकाने विकसकाचे अपहरण
Published on

बंदुकीच्या धाकाने विकसकाचे अपहरण

खडवली जंगलातून सहा तासांत सुटका

उल्हासनगर, ता. ३१ (वार्ताहर) : भरदिवसा रिव्हॉल्व्हरच्या धाकाने कल्याणमधील विकसक जयराम नेहलानी यांच्या अपहरणाने माेठी खळबळ उडाली. उल्हासनगर आणि ठाणे पाेलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून सहा तासांत खडवलीच्या जंगल परिसरातून नेहलानी यांची सुटका केली. या कारवाईदरम्यान एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याने या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे.

गोलमैदान परिसरातून सोमवारी सकाळी १०.३०च्या सुमारास चार जणांनी नेहलानी यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांचे पांढऱ्या स्कॉर्पिओमधून अपहरण केले. याबाबत माहिती मिळताच ठाणे पोलिसांसह परिमंडळ चारमधील विविध पथके तातडीने सक्रिय झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, संशयित नेहलानी यांना गोवेली-टिटवाळा मार्गाने घेऊन जात होते. पोलिस पथके मागावर असल्याची कुणकुण लागताच त्यांनी खडवलीच्या जंगल परिसरात स्कॉर्पिओ सोडून पलायन केले. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवून नेहलानी यांची सुटका केली. त्यानंतर खडवली रेल्वे स्थानक परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे समजते. या अपहरणामागे खंडणीचा हेतू होता का, याचा पोलिस तपास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या कारवाईत पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com